Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

राजीनामा मागणाऱ्यांनी स्वतःची पात्रता तपासून बोलावे : आप्पराय बिराजदार

जत (सोमनिंग कोळी) 
आमदार विक्रमसिंह सावंत यांचा राजीनामा मागणाऱ्यांचा रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार आम जनतेला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आपली पात्रता तपासूनच आरोप करावेत, असा टोला काँग्रेसचे जत तालुका अध्यक्ष अप्पाराया बिरादार यांनी विरोधकांना लगावला आहे.

जत तालुक्यातील भाजपचे पदाधिकार्यांनी रोजगार हमी योजनेत मोठा भ्रष्टाचार केला आहे. हे जत तालुक्यातील जनतेला माहिती आहे. त्यांनी अधिकांऱ्यावर दबाव टाकून बेकायदेशीर कामे मंजूर केली. रोजगार हमीच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. त्यात हे सर्व आरोप करणारे सामील आहेत. त्यांच्यामुळे अनेक निरपराध कर्मचारी, अधिकारी यांच्या वर कारवाई झाली.

त्यामुळे दुष्काळी जनतेची विकासाची गंगोत्री असणारी रोजगार हमी योजना बंद पडण्याचे काम या लोकांनी केले आहे. कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार जनतेशी नाळ जुळवून अनेक वैयक्तिक व सार्वजनिक कामे केल्याने आतापर्यंतच्या विक्रमी मताने निवडून आल्याने त्यांच्या पोटात पोटसूळ उठले आहे. काहीही लायकी नसताना आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यावर टीका करतात.

जत तालुक्यात पावसाळ्यापूर्वी पूर्व भागातील तलाव भरण्यासाठी कर्नाटक राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री मा. एम. बी. पाटील यांना विक्रमसिंह सावंत यांनी माणुसकीच्या दृष्टीने शक्य होईल तेवढे दुष्काळी भागाला पाणी द्या, असे विनंती केली. त्यामुळे तुबची बबलेश्वर योजना चालू ठेऊन पूर्व भागातील अनेक तलाव भरून दिले. हे त्याभागातील शेतकऱ्यांना चांगले माहित आहे. आमदार सावंत यांनी दीड वर्षाच्या कालावधीमध्ये झालेल्या तिन्ही अधिवेशनात तालुक्यातील जिवंत प्रश्नावर २०-२० मिनिटे तालुक्यातील जनतेच्या व्यथा सभागृहात व्यक्त केल्या हे तालुक्यातील जनतेला माहिती आहे, असे मत बिरादार यांनी व्यक्त केले.

यावेळी जत तालुका अध्यक्ष अप्पाराया बिरादार , कार्याध्यक्ष सुजय शिंदे, महादेव पाटील, भूपेंद्र कांबळे , बाबासाहेब कोडग, संतोष पाटील, तुकाराम माळी, अभिजित चव्हाण, महादेव कोळी, निलेश बामणे, मारुती पवार, मल्लेश कत्ती, विकास माने, आकाश बनसोडे, दादासाहेब दुधाळ, राजू यादव, हे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments