Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कृष्णाकाठचे संवर्धन ही आपली जबाबदारी : जे. के. जाधव

साटपेवाडी : येथे ग्रामस्थांना माहीती देताना जे के जाधव (बापू) सुधीर जाधव व प्रकल्प पदाधिकारी मा. सरपंच शशिकांत साटपे.

वाळवा (रहिम पठाण) : कृष्णा जपली पाहीजे म्हणून  एकत्रित प्रयत्न करने गरजेचे आहे.  यासाठी माझी माय कृष्णा हा उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती मानसिंग बँकेचे अध्यक्ष  व काँग्रेसचे जेष्ठ नेते मा. जे. के. जाधव (बापू) यांनी दिली आहे. या उपक्रमा अंतर्गत कृष्णा काठावरती बांबूची लागवड केली जाणार आहे. आज या सर्व प्रकल्पाची माहीती  गौंडवाडी, साटपेवाडी, मसुचीवाडी, जुनेखेड व नवेखेड येथे ग्रामस्थांना देण्यात आली.

या उपक्रमामुळे नदीचे काठ सुरक्षित राहतील, काठावरली शेती व्यवस्थित राहील. पुराचा धोका कमी होण्यास मदत होईल, शेतकऱ्यांना यातून उत्पन्न मिळेल, पर्यावरण आणि जैवविविधतेचे संवर्धन व नदीकाठचे सुशोभिकरण होईल. या उपक्रमासाठी लागणारी संपूर्ण रोपे ही मोफत उपलब्ध केली जातील. फक्त एक अर्ज करुन रोपे मिळू शकतात. याची सुरवात 21 मार्च पासून होणार आहे, असे जाधव यांनी स्पष्ट केले आहे. 

यावेळी साटपेवाडीचे मा. सरपंच शशिकांत साटपे उप सरपंच अशोक साटपे, गौंडवाडीचे सरपंच योगेश लोखंडे, अधिक चव्हाण, जुनेखेडचे सरपंच विशाल कुंभार नवेखेडचे किरण चव्हाण, दादासो चव्हाण, गणपती पाटील, हणमंत पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.


अधिक वाचा :

नाना पटोले यांचे गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन

काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी आशा पाटील
Post a comment

0 Comments