Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

क्रीडा शिक्षक यशवंत चव्हाण यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

खानापूर : क्रीडा शिक्षक यशवंत चव्हाण यांचा सत्कार करतांना खानापूर चे नगराध्यक्ष मा श्री तुषार मंडले व अन्य.

खानापूर ( वैभव कदम )
शब्दपंख पब्लिकेशन पुरस्कृत राज्यस्तरीय क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळालेल्या मॉडर्न हायस्कूल विटेच्या श्री यशवंत चव्हाण सर यांचा सत्कार सोहळा खानापूर तालुका क्रिडा शिक्षक संघटनेच्या वतीने उत्साहात साजरा झाला. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर चे नगराध्यक्ष मा श्री तुषार मंडले उपस्थित होते. 

श्री चव्हाण सर हे राष्ट्रीय खो - खो खेळाडू असून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघाचे कर्णधार पद त्यांनी भूषविले आहे. त्यांना आतापर्यंत पद्मभूषण वसंतदादा पाटील पुरस्कार, जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, पं. स. खानापूर गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार, कृतिशील क्रीडा शिक्षक पुरस्कार व शब्दपंख पब्लिकेशनचा राज्यस्तरीय क्रीडाभूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचा सत्कार नगराध्यक्ष मा श्री तुषार मंडले यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना अगस्ति विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संतोष नाईक सर यांनी क्रीडा शिक्षकाचे शाळेतील महत्त्व व भूमिका सांगितली. शाळेला शिस्त लावण्यात व नावलौकिक मिळविण्यात क्रीडा शिक्षक कसा महत्वाचा आहे हे सांगून चव्हाण सरांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सत्कारमूर्तीं चव्हाण सर यांनी बोलताना सांगितले की, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून तालुक्यातील प्रत्येक क्रीडा शिक्षक व संघटनेचा आहे .यापुढेही असेच चांगला खेळाडू घडविण्याचे व तालुक्याचे नाव मोठें करण्याचे स्वप्न बोलून दाखविले.

प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष मा श्री मंडले यांनी क्रीडा संघटनेच्या कार्याचे कौतुक केले व कोणतेही कार्य यशस्वी होण्यासाठी संघटना असली पाहिजे, ती टिकली पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमास अर्जुन गिरी सर (मा चेअरमन माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्था) ,श्री पवार सर (मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कुल भुड), प्राचार्य श्री पाटील सर (शोभदेवी पवार इंग्लिश स्कुल खानापूर), तालुक्यातील सर्व क्रीडा संघटना पदाधिकारी व क्रीडाशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवशरण सर यांनी केले व आभार श्री माळी सर यांनी मानले. तर सूत्रसंचालन श्री खाडे सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments