Daily Mahasatta

Daily Mahasatta

महा ' वसुली' सरकार बरखास्त करा: माजी आमदार विलासराव जगताप

जत , (सोमनिंग कोळी)
जत येथे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी जत तालुका भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी आमदार विलासराव जगताप यांनी महाविकास आघाडी सरकार हे महावसुली सरकार असल्याचा आरोप करत राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी विलासराव जगताप म्हणाले, वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दर महिन्याला १०० कोटी हप्ता वसूलीचा टार्गेट देण्यात आले असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. तसेच या सरकारवर जनतेचा विश्वास राहिला नाही, अनेक मंत्र्यांच्या भानगडी बाहेर येणार आहेत, शिवाय वाझे प्रकरण आणि राज्य सरकार मधील विविध भानगडीचा तपास केंद्रीय पथकाने करावा, अशी आमची मागणी असल्याचेही जगताप म्हणाले.

यावेळी बोलताना भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल पवार म्हणाले, आघाडी शासनातील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सारख्या एका प्रमुख मंत्र्यावर आरोप झाले असताना जतचे आमदार अजून मूग गिळून गप्प का ? त्यांनी गृहमंत्र्यांचा निषेध करावा, असा टोला लगावला. यावेळी बोलताना भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सरपंच बसवराज पाटील म्हणाले की, वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख हे फक्त प्यादे आहेत. यामागील मास्टर माईंड निराळाच असून केंद्रीय तपासणी पथक नेमून या प्रकरणाची चौकशी करून मास्टर माईंडला शोधावे.

यावेळी जत तालुका भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारच्या निषेधाचे घोषणा दिल्या. भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जगताप, प्रभाकर जाधव, पापा कुंभार, मिलिंद पाटील,माजी सरपंच प्रमोद सावंत, संतोष मोटे, प्रकाश मोटे, नगरसेवक प्रकाश माने, सरपंच राजाराम जावीर, आयुब सय्यद, सुनिल आरगोडी यांच्या सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments