Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कोरोनामुळे पेठची यात्रा रद्द, गावाला आले पोलीस छावणीचे रूप


पेठ (रियाज मुल्ला)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेठ ता. वाळवा येथील खंडेश्वर माणकेश्वर देवाची यात्रा जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून रद्द करण्यात आली असून आज यात्रेचा मुख्य दिवस असल्याने गावातील प्रमुख मार्ग गल्ली- बोळ याठिकाणी लाकडी बांबू च्या साहाय्याने सर्व मार्ग बंद केलेले आहेत. संपूर्ण परिसरात पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

महाराष्ट्र - कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या खंडेश्वर माणकेश्वर यात्रेला लाखो भाविकांची आज मुख्यदिवशी दर्शनासाठी गर्दी होते. मात्र कोरोना च्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नुसार व ग्रामपंचायत पेठ च्या ठरलेल्या बैठकीमध्ये यावर्षीची यात्रा रद्द करण्यात आली असून दर्शनासाठी ही मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मुख्य दिवशी होणाऱ्या यात्रेची गर्दी टाळावी या उपाय योजनेतून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Post a comment

0 Comments