Daily Mahasatta

Daily Mahasatta

शालेय फी पालकांनी भरावी : संस्थाचालक

 

सांगली (प्रतिनिधी) : शालेय फी संबंधित सध्या सुरु असलेल्या चर्चेच्या पार्शवभूमीवर सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेची संघटना यांची संयुक्त मिटिंग सिटी हायस्कुल सांगली येथे पार पडली. इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या चालू वर्षाची फी अन्यायकारक पद्धतीने आकारली जाते याबाबत आक्षेप घेणार्या संबधिताकडून खुलासा घेण्यात आला. यावेळी त्यांनी केलेल्या खुलाश्यानुसार काही इंग्रजी माध्यमांच्या शाळाकडून उशिरा फी भरल्यास १० ते २०% लेट फी आकारत असल्याचे आणि दरवर्षी २०% फी वाढ करत असल्याचे सांगितले.

यावेळी उपस्थित इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या प्रतिनिधींनी सांगली जिल्हयातील कोणत्याही इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडून अश्याप्रकारे दंड वसूल केला जात नसल्याची आणि अवाजवी फी वाढ केली नसल्याचे सांगितले. मा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार चालू वर्षाची फी ५ ते ६ हप्त्यात घेत असल्याचे सांगितले. आर. टी .इ कायद्यानुसार १५ % फी वाढ करणे मान्य असतानाही गेल्या वर्षी महापूर आणि चालू वर्षी कोरोना संकटाच्या परिस्थितीमुळे बऱ्याच शिक्षणसंस्थांनी फी वाढ केली नाही. कोरोना काळात अतिशय चांगल्या पद्धतीने ऑनलाइन शिक्षण इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडून दिल्याचे सांगितले.

शासनाचे कोणतेही अनुदान किंवा सहाय्य इंग्रजी माध्यमांच्या शाळेला मिळत नाही . संस्था चालवण्यासाठी लागणारे पगार आणि प्रशासकीय खर्च , कोरोना नियमानुसार शाळा चालविण्यासाठी येणार खर्च संस्थाचालकांनाच करावा लागतो . या शिक्षणसंस्था विध्यार्थ्याच्या फी वरच चालतात. विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम या शिक्षणसंस्था करीत आहेत. मात्र या शाळांची फी भरू नका असे सांगत काही लोक संबंधित शाळेत अडचणी निर्माण करतात. अश्या वेळी जागरूक पालकांनी आपल्या पाल्याच्या हिताचा विचार करून फी भरावी आणि शाळेना सहकार्य करावे असे आवाहन सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील आणि इंग्लिश मेडीयम स्कुल फोरमचे अध्यक्ष बाहुबली कबाडगे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

तसेच शाळा बाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी हि स्वयंम अर्थचलीत खाजगी शिक्षण संस्थांची जबादारी नाही त्यामुळे हे सर्वेक्षण खाजगी शाळा करणार नसल्याचा ठराव या मिटिंग मध्ये मंजूर करण्यात आला.

या बैठकीस सर्वश्री नितीन खाडिलकर. अरुण दांडेकर, प्रा. एम.एस.राजपूत व इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments