Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

मसुचीवाडीत शाॅर्ट सर्किटमुळे भीषण आग

वाळवा (रहिम पठाण)
मसुचीवाडी ता. वाळवा येथे संभाजी रामचंद्र कदम याच्या घरासमोर असणाऱ्या लाईटच्या तारा तुटून रविवार सकाळी 9 च्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत वैरणीच्या गंजी पेटून मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संभाजी कदम
यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडाची एक झावळी लाईटच्या तारेवरती पडली. त्याने तारा तुटल्या आणि मोठी आग लागली. घराच्या बाजूलाच त्याचे वैरणीच्या गंजा होत्या त्यांनी पेट घेतला. त्यामुळे आग भडकली आणि त्यानी रुद्र अवतार घेतला. घरा समोर वाहने उभी होती त्यांनाही झळ बसल्या. वाहने बाहेर काढतना संभाजी कदम यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.

आग वाढत असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सोबत गावातील तरुण ही घटना स्थळी धावले व आग आटोक्यात आणली व पुढचा अनर्थ टळला. गावात वीज मंडळाचे दुर्लक्ष असल्याची चर्चा सुरु आहे. तारा तुटून ही डीपी मधील एल सी बी पडला नाही. त्यामुळे लाईट बंद होण्यास वेळ लागला. गावात असणाऱ्या तारावरती अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या आहेत. आज जी घटना घडली तशी नंतर घडू नये व कोणतीही जीवित हानी होऊ नये नाहीतर याला गावातील महावितरणचे कर्मचारी जबाबदार राहतील. म्हणून याची लवकर दखल घेऊन योग्य कार्यवाही महावितरण अधिकाऱ्यांनी करावी व योग्य ठिकाणी तारांना गार्ड घालणे, योग्य विद्युत दाब अशा उपाय योजना कराव्यात अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Post a comment

0 Comments