Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

पेठ (रियाज मुल्ला)
न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पेठ येथे रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते विद्यादेवता सरस्वती व कासेगाव शिक्षण संस्थेचे संस्थापक लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक उप कार्याध्यक्षा एस. एस. पतंगे यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.

त्यानंतर मिसेस इंडिया इंटरनॅशनल प्लॅटिनम विजेत्या शुभांगी राजेंद्र शिंत्रे यांचे स्वागत विद्यालयाचे गौरवचिन्ह, बुके व प्रमाणपत्र देऊन सौ. एस. एस. पतंगे मॅडम यांनी केले. कोल्हापूर विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर मा. योगेश वेळापुरे यांचे स्वागत कार्याध्यक्ष श्री. एन. डी. पाटील सर यांनी केले. कोल्हापूर विभाग हायवे ट्राफिकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. जगन्नाथ जानकर साहेब यांचे स्वागत जूनिअर विभागाचे ज्येष्ठ शिक्षक प्रा.ए.ए. निकम सर यांनी केले.

शुभांगी शिंत्रे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रथम आपण स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे असे सांगितले. माझ्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासात मला माझ्या घरच्यांनी खूप मोठे सहकार्य केले त्यामुळेच मी मिसेस इंडिया इंटरनॅशनल हा किताब मिळवू शकले. सामाजिक कार्याबरोबरच मी उत्तम कथ्थक व कुचिपुडी नृत्य करू शकते. राजस्थानी भावई या प्रकारात डोक्यावर अकरा मडकी घेऊन नृत्य करू शकते. विद्यार्थ्यांनी एखादी कला निश्चितपणे जोपासण्याचा प्रयत्न करावा. आपल्या आई वडिलांची मान अभिमानाने ताठ राहील यासाठी सदैव प्रयत्न करावेत. अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यावा व यश संपादन करावे.

कोल्हापूर विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर मा. योगेश वेळापुरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व विद्यालयातील विविध उपक्रमांचे कौतुक केले. ज्यांच्यामुळे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त स्पर्धा घेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले ते कोल्हापूर विभाग हायवे ट्राफिक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. जगन्नाथ जानकर साहेब यांनी आपल्या मनोगतात विद्यालयाच्या शिस्ती संदर्भात गौरवोद्गार काढले. विद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून मला याचा अभिमान आहे. तसेच विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या मध्ये सहभाग घेतल्याबद्दल व क्रमांक प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन केले.

यावेळी वक्तृत्व स्पर्धेत कु. वैष्णवी सुभाष नायकल, कु. जान्हवी राजेंद्र जांगळे, कु. वैष्णवी उत्तम यादव यांचा अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आला. निबंध लेखन स्पर्धेत कु. वैष्णवी सुभाष नायकल, स्नेहा उत्तम माळी, प्रतीक्षा सुधीर चव्हाण, तसेच चित्रकला स्पर्धेत वैष्णवी उत्तम यादव, ओंकार चंद्रकांत माळी, सुरज जालिंदर माळी यांनी अनुक्रमे प्रथम ,द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख एन. एस. पाटील, जुनिअर विभाग प्रमुख श्री. बी. डी. जाधव, एम. एस. सोनुलकर, उमेश आडके, सौ. एस. एस. पाटील, एस. आर. बनसोडे, व्ही. आर. माळी , एन. व्ही. विरभक्त, कलाशिक्षक श्री अरविंद कोळी, एम. डी. लांघी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. एस. पांढरबळे व आभार श्री. ए. टी. कांबळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments