Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सेंद्रिय गुळ व काकवी केंद्रास कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके यांची भेट

कापरी : येथील संदीप पाटील यांचे शेतकरी ते थेट ग्राहक सेंद्रिय गुळ व काकवी विक्री केंद्रास अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके यांची भेट.

शिराळा (विनायक गायकवाड)
कापरी ता. शिराळा येथील सेंद्रिय शेती करणारे संदीप पाटील यांचे शेतकरी ते थेट ग्राहक सेंद्रिय गुळ व काकवी विक्री केंद्रास अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर कार्यालय यांनी भेट दिली.

यावेळी त्यांनी सेंद्रिय गुळ व काकवी निर्मिती, विक्री नियोजन तसेच ऊस पिकासाठी वापरल्या जाणाऱ्या घरगुती बनविलेल्या सेंद्रिय निविष्ठा आदींची सविस्तर माहिती घेतली.

यावेळी शिराळा तालुका कृषी अधिकारी जी. एस. पाटील, मंडल कृषी अधिकारी सुभाष घागरे, कृषी पर्यवेक्षक अनिल पाटील, कृषी सहाय्यक कैलास कारंडे, श्रीशैल्य अजेटराव, एकनाथ भोसले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल माळी, माजी सरपंच बाजीराव पाटील, अमोल पाटील, सर्जेराव पाटील, प्रसाद पाटील, अधिक पाटील व परिसरातील शेतकरी व ग्राहक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments