जत (सोमनिंग कोळी)
जत तालुक्यातील पूर्व भागातील जमीन महसूल थकबाकी असलेले सहा मोबाईल टॉवर, बारा पवनचक्की युनिट सील करण्यास सुरुवात केल्याची माहिती संख चे अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांनी दिली आहे.
अधिक माहिती अशी की, संखचे अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांनी मौजे रावळगुंडवाडी , उंटवाडी, शेडयाळ, सालेकरी, मुचंडी, व्हसपेठ, काराजनगी, कोळगीरी, वळसंग, घोलेश्वर येथील मोबाईल टॉवर्स व पवनचक्की युनिटल जमीन महसुल थकबाकी मागणीची नोटीस देणेत आली होती.
तरी मोबाईल टॉवर्स व पवनचक्की मालकांनी कोणत्याही प्रकारची जमीन महसुलाची थकबाकी अद्याप जमा केला नाही. तहसीलदार यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील तरतुदी नुसार पवनचक्की युनिट व मोबाईल टॉवर्स गुरुवार पासून सिलबंद करुन शासनजमा करण्यास सुरुवात केली आहे.
तहसीलदार यांनी बजावलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे की, सदर सील तोडलेस किंवा त्यास इजा पोचवलेस आपणावर नियमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करणेत येईल असे माहिती संखचे अप्पर तहसिलदार हणमंत म्हेत्रे यांनी दिली. यावेळी कारवाई साठी अप्पर तहसिलदार हणमंत म्हेत्रे ,तलाटी राजेश चाचे,तलाठी विशाल उदगेरी,तलाठी गणेश पवार,मंडळ अधिकारी कोळी व इंतर कर्मचारी यांच्यासह कारवाई करण्यात आले.

0 Comments