Daily Mahasatta

Daily Mahasatta

चोरी प्रकरणी कुपवाड येथील पाच तरुणांना अटक

कुपवाड ( प्रमोद अथणिकर)
कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील नवाकार डिस्ट्रीब्युटर्स नावाच्या फर्ममधून पाच चोरट्यांनी इंजिन ऑईल मटेरियलची चोरी केल्याची घटना घडली. याबाबत उद्योजक दीपक घोडावत यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात चोरी झाल्याची फिर्याद दाखल केली होती. यानुसार कुपवाड पोलिसांनी तात्काळ पोलिस पथके रवाना करून अवघ्या 12 तासात चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्या 1 लाख 36 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संशियतांवर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये सतिश आप्पासो बंडगर (वय 27), संतोष दत्ता शिंदे (वय 31), सागर कल्लाप्पा वारे (वय 28), अभिजित कल्लाप्पा वारे (वय 27), गणेश पांडुरंग बनसोडे (वय 30, सर्व राहणार शरदनगर, कुपवाड) यांचा समावेश आहे.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कुपवाड औद्योगिक वसाहतीत दीपक जयचंद घोडावत (वय 40, रा. रॉयल ग्रीन सोसायटी, माधवनगर रोड, सांगली) यांचे नवाकार डिस्ट्रीब्युटर्स नावाचे फर्म आहे. या फर्ममधून 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2021 या कालावधीत सदर फर्ममधून पाच चोरट्यांनी फर्मच्या मागील बाजूस असलेल्या दाराकडील पत्रा उचकटून आत प्रवेश करून या फर्ममधून हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या मिल्सी टर्बो टेक 15 डब्ल्यु 40सीएल 4 चे साडे सात लिटरच्या 20 बकेट (एका बकेटची किंमत 2540 रुपये) असे एकूण 50 हजार 800 रुपयांचे बकेट चोरी करून नेले होते.

उद्योजक दीपक घोडावत यांनी कुपवाड पोलिसांना चोरीची फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पोलिस पथके रवाना करून अवघ्या 12 तासात चोरीचा छडा लावून पाच चोरट्यांना गजाआड केले. त्यांच्याकडून 1 लाख 36 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 7.5 लिटरचे 20 ऑईल बकेट, 1 लि. च्या 220 बाटल्या व साडे तीन लिटरच्या 12 बाटल्या असा मुद्देमाल आहे.

सदर गुन्हा सहाय्यक पोलिस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, हवालदार युवराज पाटील, श्री. गव्हाणे, सतिश माने, शिवाजी जाधव, सचिन पाटील, नामदेव कमलाकर, इंद्रजीत चेळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित पाच आरोपींना न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. हवालदार शिवानंद गव्हाणे हे अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments