Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ गावात कोरोनाची पुन्हा एंट्री

पेठ (रियाज मुल्ला)
पेठ ता. वाळवा येथे पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील 28 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती पेठ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देवापुरे यांनी दिली.

पेठ येथे 21 डिसेंबर नंतर कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र 3 महिन्यानंतर आज पहिला रुग्ण पेठ परिसरात सापडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पेठ गाव मोठे आहे. विविध कार्यक्रम निमित्त गर्दी होत असते. यात्रेसारखा गर्दी चा काळ पेठ ग्रामपंचायतीने अन नागरिकांच्या सहकार्याने व्यवस्थित पार पडला आहे. इथून पुढील काळात नागरिकांनी काळजी घ्यावी, मास्क चा वापर करावा, हात वारंवार धुवावेत, सॅनिटायझर चा वापर करावा ,सुरक्षित अंतर राखावे असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन  समिती अध्यक्ष शंकर पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments