Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यातील बाळासाहेब पाटील यांना समतादूत पुरस्कार प्रदान

विटा : सामाजिक कार्यकर्ते मा. बाळासाहेब पाटील यांना रिपब्लीन युथ फोर्स सांगली यांच्यावतीने संत रविदास महाराज समतादूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

विटा (प्रतिनिधी) रिपब्लीन युथ फोर्स सांगली जिल्हा यांच्या वतीने देण्यात येणारा संत रविदास महाराज पुरस्कार 2021 चा मानाचा समजला जाणारा समतादूत पुरस्कार या वर्षी मा. बाळासाहेब नामदेव पाटील यांना त्यांच्या सामाजिक कामाचा गौरव म्हणून देण्यात आला आहे. यावेळी  रिपब्लिकन युथ फोर्स चे मा. महेंद्र गाडे यांनी  बाळासाहेब पाटील यांच्या 20 वर्षाच्या सामाजिक कार्याचा आढावा घेवून ते वृध्द, निराधार व अपघातग्रस्तांना सहाय्य व मदत करीत आहेत  असे सांगुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी बाळासाहेब पाटील यांनी आपले हे काम या पुढेही चालुच राहील, समता दूत पुरस्कार मिळाला. त्यामुळे नविन कार्य करण्यासाठी आनंद वाटतो तसेच तळागाळापर्यंत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरस्कार देणारे यांनी सुध्दा मनाचा मोठेपणा दाखविल्याबद्दल आभार व्यक्त केले

पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे कोरोना पार्श्वभुमीवर प्रशासनाचे आवहानानुसार कार्यक्रम रद्द करून आपला सन्मान आपल्या दारी या मोहिमेद्वारे मा. महेंद्र गाडे, परसराम कोळी, गणेश कांबळे, प्रकाश कांबळे, शहाबुद्दीन शेख, सागर वाघमारे, सुभाष दबडे, गौतम कांबळे यांनी सत्कारमुर्तीच्या घरी जावून त्यांना पुरस्कार प्रदान केला. यावेळी उमेश जंगम, मोहन पाटील, विष्णु सुतार उपस्थित होते.

* अधिक वाचा *


Post a Comment

0 Comments