Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

श्रद्धा मॉड्युलर फर्निचर व पट्टणशेट्टी होंडाचा पाचवा वर्धापनदिन

सांगली (प्रतिनिधी)
गणरायाच्या आशीर्वादाने व सांगलीच्या तमाम लोकांच्या सहकार्याने पट्टणशेट्टी होंडा व श्रद्धा मॉड्युलर फर्निचर पाचवा वर्धापनदिन साजरा करीत आहे. वर्धापन दिनानिमित्त पट्टणशेट्टी होंडाने पाच भव्य ऑफर्स आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

होंडाच्या प्रत्येक खरेदीवर एक ग्रॅम सोन्याचे नाणे मोफत मिळणार आहे. शंभर टक्के लोन उपलब्ध असून गाडीची डिलिव्हरी त्वरित मिळणार आहे. जुन्या गाडीसाठी एक्स्चेंज बोनस दोन हजार रु असून इंजिन वरती सहा वर्ष वॉरंटी मोफत दिली जाणार आहे .सर्व फायनान्स कंपन्यांकडून कमीत कमी व्याजदरामध्ये लोन उपलब्ध असून (७.९९% ) स्पॉट बुकिंगवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा दिली जाणार आहे.

सर्व गाडय़ा हजर स्टॉकमध्ये उपलब्ध असून सदर ची ऑफर जत,संख व उमदी या सबडीलरकडे सुद्धा उपलब्ध आहे. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा घ्यावा असे आवाहन पट्टणशेट्टी होंडाचे सेल्स मॅनेजर अभिजीत पवार यांनी केले आहे. सर्वीस सेंटर मध्ये सुद्धा फ्री चेकअप कॅम्प आयोजित केला असून सदर ची ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे.

पाच वर्षांमध्ये पट्टणशेट्टी होंडाचे चाळीस हजारांहून जास्त समाधानी ग्राहक असून पट्टणशेट्टी होंडास कस्टमर सर्व्हिस मध्ये भारतातील नंबर एक डीलर होण्याचा मान मिळाला आहे .अल्पावधीमध्ये ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये पट्टणशेट्टी होंडा ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून ग्राहकांचा शंभर टक्के विश्वास संपादन केला आहे .भारतातील नंबर एक डीलरशिप होण्यामध्ये सर्व पटनशेट्टी होंडाचे सेल्स व सर्वीस मधील कर्मचाऱ्यांचे योगदान असून संपूर्ण सांगलीकरांची साथ मिळाली आहे.

तसेच श्रद्धा मॉड्युलर फर्निचर हे पंचवीस हजार स्क्वेअर फूटाचे शोरूम असून सर्व फर्निचर वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून दिले आहे. श्रद्धा मॉड्युलर फर्निचर प्रायव्हेट लिमिटेड शोरुम उत्तम दर्जा व योग्य किमतीसाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले आहे व शोरूममधील सर्व मटेरियल उत्तम दर्जाचे असून त्यामध्ये सोफा, डायनिंग टेबल, ऑफिस टेबल ,ऑफिस चेअर्स, टी टेबल, वॉर्डरोब लोखंडी कपाटे, झोपाळे व इतर असंख्य मटेरियल उत्तम दर्जाचे उपलब्ध आहे. वर्धापनदिनानिमित्त पंचवीस हजारांच्या खरेदीवर एक ग्रॅम सोन्याचे नाणे मोफत दिले जाणार आहे. सदरची ऑफर सुध्दा मर्यादित कालावधीसाठी असून ग्राहकांनी याचाही लाभ घ्यावा असे आवाहन श्रद्धा मॉड्युलर फर्निचरच्या संचालकांनी केले आहे .

वर्धापन दिनाचे औचित्य साधून सत्यनारायण महापूजा , ग्राहक मेळावा व रक्तदान शिबीर आयोजित केले असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालकांनी केले आहे.


Post a comment

0 Comments