Daily Mahasatta

Daily Mahasatta

टीआरजी प्रेशर वॉशर सुशितो मध्ये उपलब्ध

कोल्हापूर : TRG कंपनीचा प्रेशर वॉशर चे लॉन्चिंग करताना नगरसेवक तौफिक मुल्लानी. शेजारी सुशितो चे संचालक सुधाकर तोडकर, अक्षय शेळके.

कोल्हापूर ( प्रतिनिधी) : आपलं घर, ऑफिस, वाहने, आणि परिसर स्वच्छ ठेवणे आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. यासाठी TRG कंपनीचा प्रेशर वॉशर खूपच उपयुक्त आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकमिटीचे सेक्रेटरी आणि कोल्हापूर महानगरपालिकेतील नगरसेवक तौफिकअहमद मुल्लानी यांनी केले.

कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर येथील सुशितो इंटरप्राईजेस यांच्यावतीने TRG प्रेशर वॉशर ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मशीनचे लॉन्चिंग तौफिकअहमद मुल्लानी यांच्या हस्ते आणि सुशितो इंटरप्राईजेसचे संचालक आणि ज्येष्ठ उद्योजक सुधाकर तोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी तौफिकअहमद मुल्लानी यांनी TRG प्रेशर वॉशर चे महत्व सांगितले.

यावेळी तौफिकमुल्लानी म्हणाले, धूळ, कचरा, घाण आणि अस्वच्छता यामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो. अनेक आजारांपासून आपले रक्षण करण्यासाठी स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. म्हणूनच आपले घर, ऑफिस, वाहने आणि परिसर स्वच्छ राखण्यासाठी TRG कंपनीचा प्रेशर वॉशर उपयोगी आहे. स्वच्छतेसाठी उपयुक्त मशीन ग्राहकांना उपलब्ध करून देणाऱ्या सुशितो चे कार्य समाजासाठी उपयुक्त आहे असे ही मुल्लानी म्हणाले. 

सुशितो इंटरप्राईजेस चे संचालक सुधाकर तोडकर यांनी प्रेशर वॉशर च्या वापरामुळे आपला परिसर स्वच्छ राहतो, तसेच आपला वेळ आणि पैसा वाचतो असे सांगितले. TRG प्रेशर वॉशर मशीन चे प्रात्यक्षिक सुशितो मॉलमध्ये उपलब्ध असून ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही सुधाकर तोडकर यांनी केले. यावेळी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे उत्तर कोल्हापूर अध्यक्ष अक्षय शेळके, अमित मोरे, अक्षय नाडगोंडा आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुशितो चे पी. आर. ओ. अभिजीत सोकांडे यांनी केले.

* अधिक वाचा *

Post a Comment

0 Comments