शेडगेवाडी ( याकुब मुजावर)
शिरसटवाडी (ता: शिराळा) येथील वयोवृद्ध शेतकरी राजाराम पांडुरंग शिरसट (वय ८२) या शेतीची राखण करायला गेलेल्या शेतकऱ्याची बांध पेटविताना लागलेल्या आगीत होरपळून मत्यु झाला. ही घटना सोमवारी दुपारी १ च्या सुमारास घडली असून याबाबत पुतण्या मधुकर शिरसट यांनी फिर्याद दिली आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजाराम शिरसट यांची वाघाचा डोंगर परिसरात खळघाट परिसरात एक एकर शेती असून या ठिकाणी हे आपल्या पिकाची राखण करायला रोजच्या प्रमाणे सकाळी गेले होते. सोमवारी दुपारी १ च्या सुमारास शेताच्या शेजारी असणारे बांध आणि पाला पाचोळा जाळत असताना आग पिकाकडे येऊ नये म्हणून विजवत असताना त्यांचा पाय घसरल्याने तोल जाऊन ते आगीत पडले. या आगीत त्यांना ९० टक्के पेक्षा जास्त भाजल्याने होरपळून मृत्यू झाला.
त्यांचा नातू सुनील दुपारचे जेवण घेऊन गेला होता आजोबा खोपीत दिसत नसल्याने आजूबाजूला शोध घेत असताना आगीत भाजलेल्या आवस्थेतआढळले. कोकरूड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास पोलीस नाईक शिवाजी जाधव करत आहेत.

0 Comments