Daily Mahasatta

Daily Mahasatta

डॉ. पूनम उपाध्ये यांचा कर्तुत्ववान महिला पुरस्काराने सन्मान

कुपवाड (प्रमोद अथणिकर) : सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत कुपवाड येथील प्रसिद्ध डॉक्टर डॉ. पुनम उपाध्ये यांना सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कार्याबद्दल "कर्तुत्ववान महिला पुरस्कार" प्रदान करण्यात आला. 

कार्यक्रमाचे आयोजन 8 मार्च 2021 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून बालगंधर्व नाट्यगृह, मिरज येथे करण्यात आले होते. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, महिला व बालकल्याण सभापती सौ गीतांजली सूर्यवंशी (ढोपे-पाटील) यांच्या हस्ते डॉ. पुनम उपाध्ये यांना "कर्तुत्ववान महिला पुरस्कारने" सन्मानित करण्यात आले. विविधस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments