Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली महापालिकेकडून मिळणार ऑनलाईन जन्म मृत्यु दाखले

: दाखले वितरणाचा उद्या महापौरांचे हस्ते शुभारंभ

सांगली (प्रतिनिधी ) : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने आता जन्म मृत्युचे दाखले घर बसल्या नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. या ऑनलाईन दाखले वितरणाचा शुभारंभ गुरुवार ११ रोजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांचे शुभहस्ते व उपमहापौर उमेश पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, सभागृह नेते विनायक सिंहासने, विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

महानगरपालिकेच्या सांगलीतील मंगलधाम येथील आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला असून महानगरपालिकेच्या जन्म मृत्यु विभागाने सन १९५० पासूनचे दाखले ऑनलाईन उपलब्ध केले आहेत. नागरिकांना यापुढे दाखल्यासाठी महानगरपालिकेत येण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आवश्यक ती फी ऑनलाईन भरलेनंतर त्यांना ऑनलाईन दाखले उपलब्ध होणार आहेत. महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या विशेष प्रयत्नातून व मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेने ही सुविधा उपलब्ध केली आहे.

Post a comment

0 Comments