Daily Mahasatta

Daily Mahasatta

राज्यस्तरीय खो - खो स्पर्धेत भिकवडी ( बु.) संघाचे नेत्रदीपक यश

विटा  (प्रतिनिधी)
डेरवण ता. चिपळूण येथे तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त दरवर्षी डेरवण युथ गेम्सचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी कोरोनोच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून "डेरवण युथ गेम्स २०२१" चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खो-खो च्या स्पर्धा दि. २४ मार्च २०२१ ते २७ मार्च २०२१ दरम्यान पार पडल्या. या स्पर्धा राज्यस्तरीय असतात. या स्पर्धेमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रीडामंडळ भिकवडी बु. च्या १८ वर्षाखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत सह्याद्री स्पोर्ट्स मुंबई उपनगर, ईगल्स स्पोर्ट्स पुणे , युनायटेड स्पोर्ट्स ठाणे तसेच आर्यन स्पोर्ट्स रत्नागिरी या संघांचा डावाने पराभव करत या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. यामध्ये सह्याद्री स्पोर्ट्स मुंबई उपनगर विरूद्ध सानिका चाफे हिने नाबाद ९.०० मि. संरक्षण करून स्पर्धेत नवीन रेकॉर्डची नोंद केली. तसेच आर्यन स्पोर्ट्स रत्नागिरी विरूद्ध नाबाद ५ .५० मि. संरक्षण केले. भिकवडी बु. संघास रोख १०,००० रूपयांचे बक्षीस व ट्रॉफी मिळाली. भिकवडी बु. संघाने खानापूर तालुका व सांगली जिल्ह्याचे नाव राज्यात केले

सदर संघास श्री. समीर माने , श्री. अशोक काळे, श्री. सदाशिव पाटील, श्री. दत्ता पाटील व प्रिया शरनाथे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. तसेच जि. प. शाळा, भिकवडी बु. च्या मुख्याध्यापक सौ. विद्यादेवी नलवडे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सर्व शिक्षकांनीही सहकार्य केले. संघातील खेळाडू व प्रशिक्षकांचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे मा. सचिव संदिप तावडे सरांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments