Daily Mahasatta

Daily Mahasatta

माझ्या मतदारसंघातील वीज कनेक्शन तोडल्यास थेट विरोध : आ. बाबर

विटा ( प्रतिनिधी )
महावितरणकडून वीज तोडणीची सुरु असलेली कारवाई तात्काळ थांबवावी आणि सौजन्याने वसुली करावी. योग्य रितीने वसुली केलेस लोकांचे सहकार्य मिळणेसाठी आम्ही मदत करु. चुकीच्या पध्दतीने व जबरदस्तीने वसुली केलेस आम्हाला विरोध करावा लागेल असा इशारा शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी महावितरण ला दिला आहे.

कोल्हापूर विभागाच्या मुख्य अभियंत्यांना लिहलेल्या पत्रात आमदार  बाबर यांनी वीज ग्राहक , आणि शेतकऱ्यांची कैफियत मांडली आहे. राज्यात सध्या कोरोना सारखी महाभयंकर महामारी असताना महावितरण कडून थकबाकी वसूल करणेची मोहिम सुरु आहे. शेतकऱ्यांना विशेषतः वीज ग्राहकांना वीज बील वेळेत मिळत नाहीत. सदर बीले मिळाली तर एकत्रित दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व ग्राहकांना वीज भरणा शक्य होत नाही. सध्या महावितरण कडून वीजबिल वसूली करताना कोणतीही नोटीस न देता वीज कनेक्शन तोडणी सुरु आहे. तसेच महावितरण कर्मचाऱ्यांकडून अर्वाच्च भाषा वापरली जात असुन त्यामुळे महावितरण बाबत शेतक-ऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. असे आमदार बाबर यांनी लिहलेल्या पत्रात म्हणले आहे.

माझे मतदारसंघातील महावितरणकडून वीज तोडणीची सुरु असलेली कारवाई तात्काळ थांबवावी व सौजन्याने वसुली करावी. योग्य रितीने वसुली केलेस लोकांचे सहकार्य मिळणेसाठी आम्ही मदत करु. चुकीच्या पध्दतीने व जबरदस्तीने वसुली केलेस आम्हाला विरोध करावा लागेल असा इशारा बाबर यांनी दिला आहे.


 

Post a Comment

0 Comments