Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

नेर्लेत सहाजण कोरोना पाॅझिटीव्ह, वाळवा तालुक्यात खळबळ

पेठ (रियाज मुल्ला)
नेर्ले ता. वाळवा येथील चार पुरुष व दोन महिलांसह सहा जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती नेर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर शिंदे यांनी दिली आहे. गावात एकूण सहाजणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज दि. ८ रोजी पहाटे एका ८७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. दि ७ रोजी संबधित वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर घरातील महिला व पुरुष यांची अँटीजन टेस्ट घेण्यात आली. यात ४५ व ४६ वर्षीय पुरुष तर २३ व २५ वर्षीय युवक पाॅझिटीव्ह आले आहेत. तसेच ४५ व २७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटीव्ह आल्या आहेत. सर्वांची प्रकृती चांगली असून कोणालाही कसलाच त्रास नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
----------------------------
गाववाले...मास्क वापरा

नेर्ले गाव वाळवा तालुक्यातील मोठे गाव आहे. विविध कार्यक्रम होत असून यात गर्दी वाढत आहेत. मास्क वापरायला हवेत. लोकांनी काळजी घ्यावी. सामाजिक अंतर राखावे

डॉ सागर शिंदे
वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र नेर्ले

Post a comment

0 Comments