Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

चिंचणी वांगी पोलिसांनी १२ वर्ष फरार असलेल्या आरोपीला केली अटक

कडेगाव (सचिन मोहिते)
चिंचणी वांगी पोलिसांनी १२ वर्ष फरार असणार्या आरोपीला अटक केली आहे. नव्या उर्फ नवनाथ लत्या काळे रा. कोकराळे, ता. खटाव, जि. सातारा असे त्याचे नाव आहे.

मा. पोलीस अधीक्षकसो सांगली श्री दीक्षित गेडाम साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सो श्रीमती मनीषा दुबुले मॅडम यांनी पो स्टे रेकॉर्ड वरील फरार आरोपी पकडण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने चिंचणी वांगी पो स्टे गु र क्र 5/2008 भादंवि कलम 457, 380, 34 मधील 2009 पासून फरार असलेला आरोपी नामें नव्या उर्फ नवनाथ लत्या काळे रा कोकराळे, ता खटाव, जि सातारा हा औंध परिसरात आल्याची गोपनीय बातमी मिळाली. त्यावरून मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. अंकुश इंगळे , सपोनि गोसावी, psi शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली तांत्रिक पुराव्यावरून, दि. 27/3/21 रोजी रात्री 11.30 वाजणेचे सुमारास सापळा रचून त्यास पोलिस अमर जंगम, जगदीश मोहिते, राहुल कुंभार, सतीश पाटील यांनी औंध पोलिसांचे मदतीने 12 वर्षे फरार असलेल्या वरील आरोपीस औंध परिसरातून कडेगाव कोर्टच्या स्टँडिंग वॉरंट मध्ये अटक केलेली आहे. सदर आरोपी यांचेवर सांगली व सातारा जिल्हात खून, जबरी चोरी, दरोडा, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत

Post a comment

0 Comments