Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगलीत अट्टल चोरटा जेरबंद

: ५७ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त
सांगली (प्रतिनिधी)
सांगली माधवनगर बायपास रोड लगततचे बंद पंपाजवळ सोन्या चांदीच दागिने विक्रीसाठी आलेल्या एका अट्टल चोरट्यास सांगली गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. बबलु पपलु शिंदे (वय-२२ रा खंडकी ता. मंगळवेढा जि. सोलापुर) असे त्या चोरट्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सांगली माधवनगर बायपास रोड लगततचे बंद पंपाजवळ एक इसम सोने चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा लावून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव बबलु पपलु शिंदे वय-२२ रा खंडकी ता मंगळवेढा जि सोलापुर असे असल्याचे सागितले.

त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे सोन्या चांदीचे दागिणे किंमत रुपये ५७५००/- रुपये मिळाले. त्याबाबत त्यास विश्वासात घेऊन त्याचेकडे मिळाले सोन्या चांदीचे दागिणे विचारपुस करता, त्याने सांगितले साथीदारासह सावळज गावामध्ये सुमोर १ वर्षा पुर्वी रात्रीच्या दरम्यान बंद घराचे कडी कोयंडा उचकटुन त्या घरातुन सोन्या चांदीचे दागिणे चोरले असल्याचे सांगितले. 

Post a Comment

0 Comments