Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विस्फ़ोट; एकाच दिवशी आढळले २३० रुग्ण

सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्हयात कोरोनाचा विस्फोट सुरूच असून आज सोमवार ता. २२ रोजी कोरोनाग्रस्तांचा
आकडा २३० वर पोहचला आहे. सांगली महापालिका क्षेत्रात ५६, खानापूर तालुक्यात ३१ आणि वाळवा तालुक्यात ३१ असे सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत. तर पलूस तालुक्यात सर्वात कमी म्हणजे २ रूग्ण आढळून आले. जिल्ह्यात सद्या १ हजार ३ रूग्ण उपचाराखाली आहेत.

सांगली जिल्हयात गेल्या दहाबारा दिवसात कोरोनाच्या रूग्णात झपाट्याने वाढ होते. आहे. गेल्या काही दिवसात रूग्ण संख्या दोनशेच्या आसपास पोहचली होती मात्र आज सोमवारी जिल्हयात २३० कोरोना बाधित रूग्ण आढळन आले. शहरी भागाप्रमाणेच आता
ग्रामीण भागात देखील कोरोनाने जोरदार शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. खानापूर तालुक्यात
३१ आणि वाळवा तालुक्यात ३१ असे सर्वाधिक रूग्ण आढळूने आल्यामुळे एकच खळबळे. उडाली आहे.

सांगली जिल्हयात सोमवार ता २२ रोजी तालुकानिहाय आढ़ळून आलेले रूग्ण पुढील
प्रमाणे : आटापाडी- १७, जत- २७, कड़ेगाव- २१, कवठेमहकाळ - ५, खानापूर -३१, मिरज
-२७, पलूस- २, शिराळा- ५, तासगाव- ८, वाळवा-३१ तसेच महापालिका क्षेत्रातील सांगली शहर -३३ आणि मिरज १३ असे एकूण २३० कोरोना बाधित रूग्ण जिल्हयात आढळने आले आहेत. तर आज़ पलूस आणि वाळवा तालुक्यातील प्रत्येकी १-१ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

आतापर्यंत सांगली जिल्ह्यात ४९ हजार ८६५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून यापैकी ४७ हजार ०७८ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १ हजार ७७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Post a comment

0 Comments