Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली जिल्ह्यातील आरोग्य केंद्राना १८ कोटींचा निधी मंजूर: शंकर मोहिते

विटा (प्रतिनिधी)
खासदार संजयकाका पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्राचे नूतनीकरण आणि दुरुस्तीसाठी सांगली जिल्ह्याला जिल्ह्याला 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी खानापूर तालुक्यातील 22 गावातील आरोग्य केंद्रांना तब्बल एक कोटी 41 लाख 50 हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती शंकर मोहिते यांनी दिली.

मोहिते म्हणाले, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 2020 - 21 च्या बृहत आराखड्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. यामध्ये आरोग्य वर्धिनी केंद्राचे नूतनीकरण आणि दुरुस्तीसाठी सांगली जिल्ह्याला जिल्ह्याला 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. यासाठीच्या कामांना नुकतीच प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी विशेष पाठपुरावा केला होता.

खानापूर तालुक्यातील 22 आरोग्य उपकेंद्रासाठी दुरुस्ती व फर्निचर नूतनीकरणासाठी तब्बल 1 कोटी 41 लाखांचा निधी मिळणार आहे. यामध्ये बलवडी, घोटी बुद्रुक, करंजे, मोही, रेणावी, भिकवडी, हिंगणगादे, लेंगरे, माहुली, नागेवाडी, साळशिंगे, आळसंद, ढवळेश्वर, गार्डी आणि कुर्ली या गावांना प्रत्येकी सहा लाख रुपये, पळशी आणि वासुंबे या गावांना प्रत्येकी सात लाख रुपये तर बलवडी, बामणी, भाळवणी, कार्वे आणि मंगरुळ या गावांना प्रत्येकी ७.७५ लाख रुपयांचा निधी मिळणार असल्याचे शंकर मोहिते यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments