Daily Mahasatta

Daily Mahasatta

कर्नाळ रिंगरोडचे काम लवकरच मार्गी लावू : पृथ्वीराज पाटील

कर्नाळ : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा सत्कार करताना सरपंच संध्या कांबळे, उप सरपंच युवराज पाटील व अन्य.

सांगली, ( राजेंद्र काळे)
कर्नाळ गावच्या रिंगरोडचे काम लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज कर्नाळ ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत बोलताना दिली. कर्नाळ ते बिसूर या रस्त्याच्या कामाला येत्या महिनाभरात सुरुवात होईल असेही त्यांनी सांगितले.

कर्नाळ ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. त्यानिमित्ताने श्री. पाटील यांनी ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. यावेळी सरपंच संध्या कांबळे, उपसरपंच युवराज पाटील यांच्यासह सर्व सदस्यांचेही त्यांनी अभिनंदन केले. या वेळी पृथ्वीराज पाटील यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या सदस्यांशी चर्चा करताना श्री. पाटील यांनी गावच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी कर्नाळ गावचा रिंगरोड व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. गावाभोवती मोठी वाहतूक असल्यामुळे रिंग रोड आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. या कामाविषयी श्री. पृथ्वीराज पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. संतोष रोकडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि रिंगरोडचे सर्वेक्षण करून घेण्यास सांगितले, तसेच त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले.

कर्नाळ ते बिसूर रस्त्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्याकडे जाऊन आपण मंजुरी आणलेली आहे. या कामाची सुरुवात येत्या महिनाभरात अपेक्षित आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले. दलित वस्ती सुधारसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दलित वस्ती सुधारसह ग्रामसचिवालय, जनावरांचा दवाखाना आणि क्रीडांगण या कामासाठीही मदत मिळवून देण्याचे आश्वासन श्री. पाटील यांनी दिले.

यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य राजू पाटील, रोहन एडके, नासिर चौगुले, संतोष मिसाळ, अदिती कदम, श्रद्धा पाटील, स्वाती मोहिते, नसिम चौगुले, सुनीता नरळे, नीता बंडगर, रवींद्र शिंदे यांच्यासह पै. राजेश एडके, विक्रमसिंह कदम, नाना घोरपडे, पै. गणेश घोरपडे, अमोल पाटील, उदय कदम, रावसाहेब मोहिते, एम. डी. पाटील, नजीर चौगुले, इब्राहिम कुरणे, पिंटू रजपूत, विजय शिंदे, विजय मगदूम, आदी उपस्थित होते.


Must Read..

Post a Comment

0 Comments