Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

: एकाच दिवशी ८४ कोरोना बाधित
: चारपटीने रुग्णात वाढ

सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा सोमवार ता. १५ रोजी अक्षरशः उद्रेक झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. रविवारी २० इतका कोरोना बाधितांचा असलेला आकडा आज चारपटीने वाढून जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ८४ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले. त्यामुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या तीन चार महिन्यांत सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा पूर्णता नियंत्रणात आला होता. जिल्ह्यात सरासरी १० च्या आसपास दररोज कोरोना बाधित आढळून येत होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोव्हीड सेंटर देखील बंद करण्यात आली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत गेला. सोमवार ता. १५ रोजी तर कोरोना ने कहर केल्यामुळे हा आकडा ८४ वर जाऊन पोहचला. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

आज दिवसभरात सांगली महापालिका क्षेत्रात २२ आणि खानापूर तालुक्यात १८ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढील प्रमाणे : आटपाडी- ४ जत -३ कडेगाव -११ कवठेमंहकाळ- १ खानापूर- १८ मिरज -५ पलूस -० शिराळा -८ तासगाव- ७ वाळवा -५ यासह महापालिका क्षेत्रातील सांगली शहर- १४ आणि मिरज शहर -८ असे एकूण ८४ रुग्ण आढळून आले आहेत.

खानापूर तालुक्यातील १८ रुग्णापैकी ९ रुग्ण हे विटा शहरातील आहेत. त्यामुळे सांगली महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात देखील कोरोना झपाट्याने वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोना ला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात ? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. 

Post a Comment

0 Comments