Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली ब्रेकिंग... लॉकडाऊनला 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

सांगली ( प्रतिनिधी ) 

सांगली जिल्ह्यात लाॅकडाऊनला 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या कालावधीत सर्व सामाजिक/ राजकीय / क्रिडा / करमणूक / सांस्कृतिक कार्यक्रम तसेच इतर मेळावे प्रतिबंधित असतील. तसेच विवाह कार्यक्रमासाठी 50 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित येण्यास प्रतिबंध असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ अभिजित चौधरी यांनी दिली आहे. 

जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी म्हणाले, राज्य शासनाकडील दि. 29 जानेवारी 2021 च्या आदेशातील निर्देशानुसार जिल्हाधिकारी सांगली कार्यालयाकडील दि. 29 जानेवारी 2021 रोजीच्या आदेशान्वये सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली होती. राज्य शासनाकडील दि. 24 फेब्रुवारी 2021 रोजीच्या आदेशान्वये त्यांच्याकडील दि. 30 सप्टेंबर 2020 व 14 ऑक्टोबर 2020 च्या आदेशाना दि. 31 मार्च 2021 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हा दंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हाधिकारी सांगली कार्यालयाकडील दि. 1 व 15 ऑक्टोबर 2020 रोजी जारी केलेल्या आदेशांना दि. 31 मार्च 2021 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

तसेच सांगली जिल्ह्यात दि. 31 मार्च 2021 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत पुढील बाबींना प्रतिबंध केला आहे.

सर्व सामाजिक/ राजकीय / क्रिडा / करमणूक / सांस्कृतिक कार्यक्रम तसेच इतर मेळावे प्रतिबंधित असतील. विवाह कार्यक्रमासाठी 50 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित येण्यास प्रतिबंध असेल. जिल्ह्यात धार्मिक जत्रा / यात्रा / उरूस भरविण्यास प्रतिबंध असेल. या व्यतिरिक्त यापूर्वी आदेशाने बंदी अथवा सूट देण्यात आलेल्या क्रिया / बाबी कायम राहतील. सूट देण्यात आलेल्या आस्थापनांनी, शासनाने त्या-त्या विभागासाठी / आस्थापनांसाठी नेमून दिलेल्या मार

* अधिक वाचा *


Post a Comment

1 Comments