Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

दलित वस्तीसाठी 3 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर : सुहास बाबर

विटा (प्रतिनिधी)
आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाचा विकास अत्यंत नियोजन पद्धतीने चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून खानापूर तालुक्यातील जवळपास सर्व गावांसाठी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत समाजकल्याण मधून तब्बल 3 कोटी 30 लक्ष एवढा भरघोस निधी जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि समाजकल्याण समितीच्या सदस्या निलमताई सकटे, सुलभा ताई अदाटे यांच्या प्रयत्नातून मिळाले आहेत.

युवा नेते सुहास बाबर म्हणाले, की मतदारसंघात मागेल त्या गावाला काम हे नियोजन राबवून आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाचा विकास अत्यंत नियोजनबद्द पद्धतीने सुरू आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावातील दलीतवस्ती सुधार योजनेअंतर्गत अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट, पेविंग्ज ब्लॉक इत्यादी कामांना प्राधान्य देऊन गावातील मागणी प्रमाणे प्राधान्य देऊन ही कामे अत्यंत चांगल्या दर्जाची करण्यात येतील.

मतदारसंघाच्या विकासासाठी गावातील लोकांनी गटतट विसरून एकत्र यावे असे आवाहन ही त्यांनी केले. गावाला जोडणारे जवळपास सर्वच रस्ते हे अत्यंत चांगल्या दर्जाचे झाले असून याचबरोबर वाडीवस्तीवरील रस्त्यांची कामे ही हाती घेतली आहेत. लोकांना दळणवळण सुविधा चांगली होण्यासाठी रस्ते चांगले असणे गरजेचे आहे लोकांनी या पुढील विकासाच्या बाबतीत कोणतेही राजकारण न करता कामे करून घ्यावीत व आपल्या गावचा आणि मतदारसंघाचा लौकिक वाढवावा.

येत्या काळात अजून 1कोटी 50 लाखाच्या निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे दलित वस्ती मधील कोणतेही काम शिल्लक राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल आणि तेथील विकासकामांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. दलीतवस्ती साठी तालुक्यातील प्रामुख्याने, रेणावी, हिवरे, बानूरगड, भाग्यनगर, भेंडवडे, धोंडेवाडी, देवीखिंडी, साळशिंगे, पारे, घानवड, करंजे, वासुंबे, बेनापूर, बलवडी (खा), माहुली, वाझर, कमळापूर, बलवडी(भा), भुड, वेजेगाव, खंबाळे (भा), घोटी (बु), भिकवडी (बु), नागेवाडी, मंगरूळ, शेंडगेवाडी, रामनगर, रेवनगाव, भांबर्डे, हिंगणगादे, भाळवणी, चिंचणी (मं),लेंगरे,गार्डी,ढवळेश्वर,गोरेवाडी, ताडाचीवाडी,जोंधळखिंडी,कार्वे,पळशी,सुलतानगादे,वलखड,चिखलहोळ,आळसंद, पोसेवाडी, ऐनवाडी, जखीणवाडी,आदी गावांतिल दलीतवस्ती मधील कामासाठी वरीलप्रमाणे निधी मंजूर झाला आहे. या निधी मंजुरी साठी समाजकल्याण सभापती प्रमोद अप्पा शेंडगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a comment

0 Comments