Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

बहे गावात 1 कोटी रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न

वाळवा (रहिम पठाण)
कोरोनाच्या कठीण कालावधीत देखील पालकमंत्री जयंतरावजी पाटील यांच्या प्रयत्नातून व बहे ग्रामपंचायत बहे यांच्या सहकार्यातून झालेल्या भरीव अशा विकासकामांचा रविवार दिनांक 21 रोजी मा. प्रतीक पाटील यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला.

पालकमंत्री जयंतरावजी पाटील साहेब यांच्या स्थानिक विकास निधी २०१९ -२० मधून मौजे बहे येथे बहे ते तुकाई खडी रस्‍ता ( निधी ४५ लाख),भैरवनाथ मंदिर ते अप्पाजी पंत गटर (निधी ५ लाख रु), मुस्लिम दफनभूमीकडे जाणारा रस्ता(निधी ५ लाख) हरिजन समाज मंदिर (निधी ९ लाख रु), मातंग बौद्ध वस्ती कडे जाणाऱ्या ओढ्यावर मोरी बांधणे (निधी ८ लाख),
बौद्ध वस्ती सामाजिक सभागृह (निधी ७ लाख ),मोहिते पाणंद रस्ता मुरुमीकरण ( निधी ५ लाख 30 हजार), थोरात पाणंद मुरमीकरण (निधी ५ लाख) तसेच बहे ग्रामपंचायत बहे यांच्या १४व्या वित्त आयोगमधुन कृषी कार्यालय व अभ्यासिका (निधी २ लाख ३५ हजार) तसेच अंगणवाडी क्रमांक २९ नूतनीकरण (निधी २ लाख ८२ हजार) या सर्व कामांचे उदघाटन प्रतीक पाटील दादा यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच यावेळी लोकवर्गणीतून साकारल्या गेलेल्या श्री बिरोबा देवालया जवळील चिल्ड्रन पार्कचे लोकार्पण करण्यात आले व सर्व अंगणवाडीना खेळणी वाटप करण्यात आली. यावेळी श्री विजयबापू पाटील ( संचालक राजाराम बापू साखर कारखाना), श्री संजय बापू पाटील (अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना), प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ छायाताई विठ्ठलराव पाटील, उपसरपंच प्रा.डॉ.सौ सुवर्णाताई शशिकांत पाटील, श्री विठ्ठलराव पाटील तात्या ( संचालक रा.बा. साखर कारखाना), श्री शिवाजीराव पाटील अण्णा (मा. चेअरमन बहे सोसायटी),प्रा.श्री शशिकांत पाटील,सौ सुवर्णाताई कृष्णराव पाटील ( संचालक रा.बा. साखर कारखाना), श्री अमोल गुरव (संचालक कृष्णा सह साखर कारखाना),श्री माणिकराव पाटील ( मा. संचालक रा. बा. साखर कारखाना), ग्रामपंचायत सदस्य श्री मनोजकुमार पाटील, श्री शिवाजीराव पाटील बापू, श्री रोहित तोरस्कर, श्री बबनराव शिरतोडे, ग्रामसेवक ए बी खोत,श्री कृष्णराव पाटील,श्री धनाजी पाटील,श्री अमर थोरात माजी सरपंच श्री सर्जेराव दमामे,माजी सरपंच श्री सुधीर रोकडे, श्री दिनकर पाटील, श्री लालासो देशमुख, श्री हणमंतराव पाचुंब्रे, श्री अशोक देशमुख, श्री अरविंद थोरात, श्री केशवराव थोरात, श्री मुनीर मुल्ला, श्री हणमंतराव नावडकर, श्री भगवान कोळेकर, श्री प्रशांत थोरात, श्री सुरज पाटील, श्री अविनाश पाटील, श्री अरुण डुकरे,श्री हेमंत सुर्यगंध तसेच मान्यवर ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Post a comment

0 Comments