Daily Mahasatta

Daily Mahasatta

पुन्हा कोरोनाची एंट्री, कार्वे गावात आठ पॉझिटिव्ह

विटा ( मनोज देवकर  ) 
राज्यात सर्वत्र जनजीवन सुरळीत झाले असताना पुन्हा कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागले आहेत. गेले दोन महिने कोविड पॉझिटिव्ह रुग्ण खानापूर तालुका आणि परिसरात आढळत नव्हते. आज अचानक आठ जणांच्या कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्या.

पॉझिटिव्ह आलेले रुग्ण कार्वे येथील असून सहा महिला आणि दोन पुरुष पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यातील करोनाचा संसर्ग आता पुन्हा एकदा वेगाने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार देखील आता कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर पुन्हा लॉकडाउन देखील लागू केला जात आहे. राज्यभरात मागील २४ तासांत ५ हजार ४२७ नवे करोनाबाधित वाढले असुन, ३८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यावरून करोनाचे संकट हळूहळू पुन्हा गडद होतं की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ८१ हजार ५२० वर पोहचली आहे.

Post a Comment

0 Comments