Daily Mahasatta

Daily Mahasatta

सदाभाऊचं खानापूरचे आमदार होणार : महापौर दिग्विजय सुर्यवंशी

सांगली : नूतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा सत्कार करताना माजी आमदार अॅड सदाशिव पाटील. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, युवा नेते अॅड. वैभव पाटील, किरण तारळेकर व अन्य.

सांगली (प्रतिनिधी)
माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांनी 23 मार्च 2020 रोजी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन मी केले होते. कारण मला भविष्यातले खानापूर आटपाडी चे आमदार म्हणून सदाभाऊ दिसत होते आणि ते होणारच याची मला खात्री आहे, असा विश्वास सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नूतन महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी व्यक्त केला.

विटा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नुतन महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुर्यवंशी यांनी विटा शहर आणि परिसराशी असलेले ऋणानुबंध व्यक्त केले. महापौर पदी निवड झाल्याबद्दल सुर्यवंशी यांचा माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष अॅड वैभव पाटील म्हणाले, " मी आणि दिग्विजय आम्ही दोघेही एकाच वर्गात शिकत होतो. 2001 पासून आम्ही राजकारणामध्ये व समाज कार्यामध्ये सक्रीय झालो. दिग्विजय सांगलीत व मी विट्यात असा आमचा राजकीय प्रवास चालू झाला. पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळेच दिग्विजय यांना नामदार जयंत पाटील यांनी संधी दिली याचा मला अभिमान आहे. जिल्ह्यातील येणाऱ्या सर्व निवडणुका या नामदार जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होऊन करेक्ट कार्यर्क्रम होणार आहे याचीच सूचना वजा निर्देश जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांना साहेबांनी या माध्यमातून दिली आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक किरण तारळेकर यांनी केले. आभार तालुका उपाध्यक्ष श्री सचिन शिंदे यांनी मानले. यावेळी विटा नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments