Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीच्या वेश्या वस्तीत रंगली नगरसेविका आणि वारांगना महिलांच्यात संगीतखुर्ची

सांगली : (प्रतिनिधी)
सांगलीच्या सुंदरनगरमध्ये एक अनोखी संगीतखुर्ची पाहायला मिळाली. समाजाचा दुर्लक्षित आणि वंचित घटक मानल्या जाणाऱ्या वारांगना महिलांसोबत महिला नगरसेविकांनी संगीतखुर्ची खेळत या महिलांना सामाजिक आधार दिला. त्यामुळे आज सुंदरनगर वेश्या वस्तीत वारांगना आणि नगरसेविकांची संगीतखुर्ची रंगली होती.


सांगली महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती गीतांजली ढोपे पाटील यांनी आज सुंदरनगरमध्ये आपल्या महिला नगरसेविकांसोबत येऊन या महिलांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी आपल्याच विश्वात जगणाऱ्या या महिलांना सामाजिक आधार देत त्यांच्यासाठी सर्वकाही शासकीय स्तरावर मदतीची ग्वाही दिली.

यावेळी या वेश्या वस्तीतील वारांगना महिलांसमवेत सभापती आणि महिला नगरसेविकानी संगीत खुर्चीचा आनंद घेत या महिलांना मानसिक आणि सामाजिक आधार दिला. या अनोख्या संगीत खुर्चीत महिला नगरसेविका आणि वारांगना यांनी मनसोक्त आनंद लुटला तर या उपक्रमामुळे वारांगना महिलाही भारावून गेल्या. यावेळी सभापती गीतांजली ढोपे पाटील, नगरसेविका अनारकली कुरणे, स्वाती पारधी, उर्मिला बेलवलकर यांनी सहभाग घेतला होता. सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.


Post a Comment

0 Comments