Daily Mahasatta

Daily Mahasatta

जाडरबोबलाद जि. प. गटात कोट्यवधी रुपयांचा विकासकामांना मंजुरी : सभापती रवी - पाटील

जत ( सोमनिंग कोळी) लोकांची मागणी,आमचा सततचा पाठपुरावा आणि योग्य नियोजनाने जाडरबोबलाद जिल्हा परिषद गटात विविध विकास कामांना मोठ्या प्रमाणात विकास निधी मंजूर करून दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जाडरबोबलाद आणि उटगी गणात विकासाची गंगा वाहणार आहे. जिल्हा परिषद मतदार संघात जिल्हा नियोजन समिती, 15 वा वित्त आयोग , ग्रामविकास , जनसुविधा , नागरी सुविधा व इतर शासनाच्या योजनेतून कोट्यावधी रुपयाचा भरीव निधी मंजूर केला असल्याची माहिती माजी शिक्षण व आरोग्य सभापती व विध्यमान जिल्हा परिषद सदस्य तम्मन्नगौडा रवी- पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे .

यावेळी तमन्नगौडा रवी-पाटील म्हणाले की , जत पूर्व भागातील रस्त्याची अवस्था फार बिकट असल्याने आणि विशेष करून जाडरबोबलाद जिल्हा परिषद मतदार संघातील जाडरबोबलाद ते उटगी या रस्त्यांसाठी 15 लाख एकोणऐशी हजार 76 रूपये मंजूर केले आहे तर सोन्याळ ते कुलाळवाडी रस्ता यासाठी 17 लाख 54 हजार 421 रूपये मंजूर केले आहे .लकडेवाडी ते पडोळकरवाडी या रस्त्याला 17 लाख 20हजार 952रूपये मंजूर केले . व जाडरबोबलाद ते शिरनांदगी या रस्त्यांसाठी 13लाख 15 हजार 311रूपये असे 64 लाख रुपयांचा निधी निव्वळ रस्त्याच्या कामासाठी मंजूर केला आहे. त्यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणावर टप्पाटप्प्याने कामे होणार आहे. ग्रामविकास व जलसुविधा योजनेतून सोन्याळ येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 या दवाखान्याचे सरक्षक भिंत बांधण्यासाठी 8 लाख 33 हजार रुपयाची तरतूद करण्यात आली आहे . तीर्थक्षेत्र गुड्डापूर दान्नम्मा देवस्थानच्या विकासासाठी विविध विकास कामासाठी 10 लाख रूपये मंजूर केला आहे .

जलसुविधा योजनेतून अंकलगी गावाच्या पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी 29 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे .तर व्हसपेठ उटगी कुलाळवाडी या गावासाठी वाटर ए. टी. एम .साठी प्रत्येकी तीन लाख 60 हजार रुपयाची तरतूद केली आहे .यासह विविध विकास कामे मंजूर असून या सर्व कामांची ऑनलाइन निविदा प्रक्रिया सुरू आहे. थोड्याच दिवसात या सर्व कामाना प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाणार आहे. 

--------------------------


*जाडरबोबलाद गटातील अंकलगी व 
लकडेवाडी शाळा मॉडेल शाळा बनवणार....

राज्यात शिक्षण विभागाने सुमारे तीनशे शाळा मॉडेल स्कूल करण्याचा संकल्प घेतला आहे. त्यानुसार जत तालुक्यातील निवड केलेल्या शाळा मॉडेल स्कूल करण्यासाठी सरसावल्या आहेत. यासाठी शिक्षक व पालकांचे चांगले सहकार्य लाभत आहे. या उपक्रमात पहिली ते आठवीपर्यंत असणाऱ्या शाळांना प्राधान्य देण्यात आले आहे. ग्रामीण शाळांचे चित्र बदलून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेने ही शाळा संकल्पना राबवली आहे. राज्याच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात आमच्या जिल्हा परिषद गटातील अंकलगी आणि लकडेवाडी येथील शाळा मॉडेल शाळा म्हणून निवड केली आहे. या शाळांचा जिल्ह्यात मॉडेल बनवण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार असल्याची माहिती तम्मनगौडा रवी -पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments