Daily Mahasatta

Daily Mahasatta

भारती डेंटलमध्ये ओरल पॅथॉलॉजी डे

सांगली : येथे डॉ. एच. एम. ढोलकीया यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना प्राचार्या डॉ. विद्या दोडवाड, दिलीप मगदूम व अन्य डॉक्टर. ( छाया: रोहित रोकडे )

सांगली / प्रतिनिधी
येथील भारती विद्यापीठ डेंटल कॉलेजमध्ये नॅशनल ओरल पॅथॉलॉजी डे भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच. एम. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला.

डॉ. एच. एम. ढोलकीया यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस देशभर साजरा केला जातो. ढोलकीया यांना भारतातील ओरल पॅथॉलॉजीचे भीष्म पिता म्हणून ओळखले जाते. डॉ. एच. एम. ढोलकीया यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या डॉ. विद्या दोडवाड आणि विभागप्रमुख डॉ. दिलीप मगदूम यांनी केले. डॉ. अनिरुद्ध वरेकर यांनी ढोलकीया यांच्या जीवनपटाविषयी माहिती दिली.

सर्व विभागप्रमुख, डॉक्टर, विद्यार्थी, इंटर्नशीप उपस्थित होते. जयंतीनिमित्त रोल ऑफ ओरल पॅथॉलॉजी इन क्लिनिकल डेंटिस्ट्री याविषयाची निबंध स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये २० डॉक्टर सहभागी झाले होते. सोप कार्विंग स्पर्धाही घेण्यात आल्या. संयोजन डॉ. दिलीप मगदूम, ममता कामत, अनिरुद्ध वरेकर, सोमेश्वर गोलगीरे, कुमार दातार, माधुरी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. कृष्ण हावळ यांनी केले.

Post a Comment

0 Comments