Daily Mahasatta

Daily Mahasatta

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे : शिराळा प्रेस क्लब

शिराळा (राजेंद्र दिवाण)
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला छत्रपती संभाजी महाराज व्याघ्र प्रकल्प असे नाव देण्याची मागणी प्रेस क्लब शिराळा यांच्या वतीने खासदार धैर्यशील माने यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदनात म्हटंले आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे येणाऱ्या पिढीला राहावे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक किल्ले येतात. त्याची आठवण म्हणून या व्याघ्र प्रकल्पास छत्रपती संभाजी महाराज सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असे नाव देण्यात यावे. पुणे बेंगलोर आशियायी महामार्गावर ते कराड जवळ असणाऱ्या पाचवड फाटा येथे चांदोली अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे असा मोठा दिशादर्शक फलक व वाळवा तालुक्यातील पेठ नाका येथे शिराळा भुईकोट किल्ला छत्रपती संभाजी स्मारक, चांदोली अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याची माहिती देणारा दिशादर्शक फलक लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष विनायक गायकवाड, कार्याध्यक्ष दिनेश हसबनीस, उपाध्यक्ष विकास शहा, सचिव शिवाजीराव चौगुले ,कार्यकारी सदस्य प्रीतम निकम, अजित महाजन, विठ्ठल नलवडे, सल्लागार निवृत्त माहिती अधिकारी हंबीराव देशमुख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments