Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत महापालिका आयुक्त उतरले रस्त्यावर, दंडात्मक कारवाईचा दणका

सांगली (प्रतिनिधी) : सांगलीत कोविडचे नियम न पाळणाऱ्या विरोधात कारवाई करण्यासाठी खुद्द महापालिका आयुक आयुक्त नितीन कापडणीस हे रस्त्यावर उतरले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यावर तसेच सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

    सांगली महापालिकेच्या ताफ्यासह आयुक्त कापडणीस यांनी शहरात अनेक सार्वजनिक ठिकाणीं अचानक भेटी देत तपासण्या केल्या. यामध्ये अनेक ठिकाणी नागरिक, व्यावसायिक हे विनामास्क आढळून आल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगलीत हा संसर्ग पसरू नये यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अवलंबल्या जात आहेत. मात्र सांगलीत नागरिकांकडून कोरोना त्रिसूत्रीचे अनुपालन केले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सांगली मनपाचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपल्या यंत्रणेच्या टीमसहित सांगलीत सार्वजनिक ठिकाणची तपासणी करीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.

    या कारवाईमुळे कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्याची चांगलीच पळापळ झाली. खुद्द आयुक्त नितीन कपडणीस हेच रस्त्यावर उतरून कारवाईत करत आहेत. या कारवाईत आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, प्रणिल माने, वैभव कुदळे, पंकज गोंधळे, धनंजय कांबळे, किशोर कांबळे, श्रीकांत मद्रासी यांच्यासह मनपाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments