Daily Mahasatta

Daily Mahasatta

अभाविप तर्फे विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात जंगी स्वागत

सांगली (प्रतिनिधी)
मागील ११ महिन्यांपासून बंद असलेले सर्व महाविद्यालय आज पुन्हा सुरू झाले आहेत.अभाविप तर्फे 2 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाविद्यालय उघडा असे आंदोलन करण्यात आले. या लढ्याला हे यश मिळाले आहे.आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाविद्यालय सुरू झाली आहेत.शिक्षणाच्या प्रवाह पासुन लांब झालेले विद्यार्थी आता पुन्हा एकदा मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थांन मध्ये एक उत्साहा चे वातावरण होते. आज विद्यार्थी परिषदे तर्फे महाविद्यालया मध्ये येणार्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे साखर व पेढे वाटुन स्वागत करण्यात आले.

सर्व विद्यार्थ्यांमध्ये एकप्रकारे उत्साह असून आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे, हा महाविद्यालय लवकर सुरू करण्यात यावे, या विद्यार्थी शक्तीच्या मागणीचा विजय आहे.

Post a Comment

0 Comments