Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

जतच्या शिवयोद्धा मंडळाच्यावतीने शिवजंयतीची जय्यत तयारी पूर्ण

जत (सोमनिंग कोळी)
येथील शिवयोद्धा मंडळाच्यावतीने जत शहरातील जि. प. प्रा. मराठी शाळेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीची जोरदार तयारी केली आहे. यासाठी येथील त्रिनेत्र डेकोरेटर्सचे मालक प्रसाद खाडे यानी भव्य मंडप उभा केला असून छत्रपती शिवाजी महाराज यांची मंडपातील सिंहासनारूढ मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर जतचे माजी आमदार विलासराव जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे सरकार, नगरसेवक स्वप्निल शिंदे, जि. प. सदस्य श्री. सरदार पाटील आदीनी छत्रपती शिवराय यांना वंदन केले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकाला शिवयोद्धा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवशाही चे स्वरूप आणले असून दिडशे बाय वीसच्या जागेमध्ये मंडळाने भव्य दिव्य असा मंडप उभा करून त्यावर वरिल बाजूस छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आईसाहेब व छत्रपती संभाजी महाराज यांचे डिजीटल लावून या चौकात भव्य अशी विद्युत रोषणाई केल्याने येथिल छत्रपती शिवाजी महाराज जयंतीउत्सव आकर्षक ठरत आहे.

शिवयोद्धा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संदिप शिंदे, संग्राम पवार, अजिंक्य सावंत, अमोल चव्हाण, सुहास चव्हाण, इंजिनिअर आश्रय बन्नेनवर, अभय कणसे, आदेश जाधव आदी कार्यकर्ते राबताना दिसत आहेत.

Post a comment

0 Comments