Daily Mahasatta

Daily Mahasatta

महावितरणने सक्तिची वीजबिल वसुली थांबवावी : आरपीआयची मागणी

पलूस : येथील उपविभागीय महावितरण कार्यालयात निवेदन देताना आरपीआय चे विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे, उपाध्यक्ष शितल मोरे, रमजान मुजावर, सलमान पठाण, किशोर मोहिते, प्रसाद शिखरे.

पलुस (अमर मुल्ला)
पलूस तालुक्यातील महावितरणच्या माध्यमातून सक्तीने विजबिलाची वसुली व वीज कनेक्शन तोडण्याचे चालू असणारे काम तात्काळ बंद करावे, अशा मागणीचे निवेदन पलूस महावितरण उपविभागीय कार्यालय, तहसीलदार, पलूस व कुंडल पोलीस ठाण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्यावतीने आरपीआय चे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे व शिष्टमंडळाच्यावतीने देण्यात आले. सक्तीची वसुली व वीज कनेक्शन तोडण्याची कार्यवाही शिथिल करू असे आश्वासन पक्ष्याच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.

यावेळी बोलताना आरपीआय चे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे यांनी सांगितले की, वर्षभर लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक हाताला काम नसल्याने हतबल झाला आहे. लॉकडाऊन काळात महावितरणने मोठ्या प्रमाणावर वाढवून वीजबिले दिली आहेत. सर्वसामान्य माणसाला दहा वीस हजाराने आलेली बिले भरणे मुश्कील झाले आहे. महाराष्ट्र शासनाने वीजबिल माफ करू असे आश्वासन देऊन नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सक्तीची वसुली थांबवावी, अन्यथा रिपब्लिकन पक्ष आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करेल, असा इशारा महावितरणला आरपीआयच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी आरपीआयचे पलूस कडेगाव विधानसभा उपाध्यक्ष शितल मोरे, मुस्लिम आघाडी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमजान मुजावर, आरपीआय मुस्लिम आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष सलमान पठाण, विद्यार्थी आघाडी पलूस तालुका अध्यक्ष प्रसाद शिखरे, युवक पलूस तालुका उपाध्यक्ष किशोर मोहिते, विजेता मंडळाचे अध्यक्ष विजय मोहिते, भिमशक्ती ग्रुपचे उपाध्यक्ष सुबोध तिरमारे, आमनापूर गावचे सुहास मोरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments