Daily Mahasatta

Daily Mahasatta

सराईत गुन्हेगार वाळवा, शिराळा तालुक्यातून हद्दपार

इस्लामपूर ( प्रतिनिधी )
पेठ (ता. वाळवा जि. सांगली) येथील सराईत गुन्हेगार मोहन काशिनाथ मदने (वय-४६) रा. उमाजीनगर, पेठ, याला ९ महिन्यांसाठी वाळवा व शिराळा तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अपर पो. अधिक्षक श्रीमती मनीषा दुबुले व उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी कुप्रसिध्द् सराईत गुन्हेगारांचे विरुध्द हददपार प्रस्ताव सादर करणेचे आदेश दिलेले होते.

मोहन मदने याच्याविरूध्द खुनाचा प्रयत्न, महिलांची छेडछाड करणे, घातक शस्त्रानिशी लोकावर हल्ला करणे, दहशत माजवणे, बेकायदेशिररित्या सावकारी धंदे करणे, खंडणी वसूल करणे, वगैरे गंभीर स्वरूपाचे ६ गुन्हे इस्लामपूर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. मोहन मदने याला मुंबई पोलीस कायदा कलम ५६ (१)(अ)(ब) प्रमाणे हददपार प्रस्ताव इस्लामपूरचे उपविभागीय अधिकारी यांना पाठवणेत आला होता.

सदर प्रस्तावावर सुनावणी होवून त्यांनी मोहन काशिनाथ मदने याला शिराळा व वाळवा तालुका कार्यक्षेत्रातून ९ महिने कालावधीसाठी हददपार केले आहे. आज या आदेशाची बजावणी करून त्याला आज सातारा जिल्हा हददीत कराड येथे सोडणेत आले आहे. नागरिकांना आवाहन करणेत येते की, पुढील ९ महिने कालावधीत मोहन काशिनाथ मदने हा वाळवा व शिराळा तालुका कार्यक्षेत्रात दिसून आलेस पोलीस ठाणेस कळवावे.

ही कारवाई पोलीस निरिक्षक नारायण देशमुख इस्लामपूर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानदेव वाघ पोना शरद जाधव, पोना प्रशांत देसाई, पोना उत्तम् माळी, पोलीस शिपाई सचीन सुतार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments