Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावेत : बाळकृष्ण यादव

जत (सोमनिंग कोळी)
: केंद्र सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावेत, अशी मागणी काँग्रेसचे जत तालुका निरीक्षक बाळकृष्ण यादव यांनी केले.जत येथे जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी सन्मान संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते, यावेळी जत तालुक्यातील काही शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराया बिराजदार ,माजी पं.स. सभापती बाबासाहेब तात्या कोडग, जि. प.सदस्य महादेव पाटील,सांगली मार्केट कमिटी माजी सभापती संतोष पाटील,माजी पं. स.सदस्य मलेश अण्णा कित्ती, मार्केट कमिटी संचालक अभिजित चाव्हन,नगरसेवक इरांना निडोनी, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष तुकाराम माळी, माजी नगरसेवक निलेश बामणे,माजी नगरसेवक महादेव कोळी,जत तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष विकास माने,जत शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश बनसोडे, काका शिंदे,दीपक शिंदे,प्रदीप नागणे,व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करावी, दिल्लीतील आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या मागे कुणाचा हात आहे, याची स्वतंत्र समिती नेमून चौकशी करावी आदी मागण्या केल्या. 

Post a Comment

0 Comments