Daily Mahasatta

Daily Mahasatta

अविनाश मोहिते यांची वांगी गट कार्यालयास भेट, शेतकर्यांनी मांडल्या व्यथा

 कडेगाव( सचिन मोहिते )
यशवंतराव मोहिते कृष्णा सह .साखर कारखाना लि . रेठरे बुद्रुकच्या वांगी येथील गट कार्यालयास माजी . चेअरमन व विद्यमान संचालक अविनाश (दादा) मोहिते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात भेट दिली , परंतु कार्यालय नेहमी प्रमाणे बंद अवस्थेत पहायला मिळाले. तब्बल ३५ ते ४० मिनिटे शेतकरी व मा .अविनाश दादा मोहिते गट कार्यालय उघडण्याच्या प्रतिक्षेत थांबलेले होते . 
यावेळी शेतकऱ्यांनी अविनाश मोहिते यांचेसमोर भोंगळ कारभाराचा जणु पाढाच वाचून दाखवला .यानंतर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर कारखाना गट कार्यालयातील कर्मचारी यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. यामध्ये बर्‍याचशा चुका व समस्या आढळून आल्या यामध्ये प्रामुख्याने कार्यालय वारंवार बंद असणे, त्याचबरोबर नोंद घेण्यास विलंब लावणे, सभासदाच्या ऊसाला तोडी न मिळणे यासह विविध प्रकारच्या समस्या व अडचणीमध्ये  सुधारणा करण्यास सांगितले असून येत्या दोन दिवसात सुधारणा झाली नाही तर वांगी येथील गटकार्यालयासमोर ठिय्या मांडणार असल्याचे सांगण्यात आले .

 सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांची व्यथा :
वांगी येथील शेतकऱ्यांनी  माजी चेअरमन व विद्यमान संचालक माननीय अविनाश मोहिते यांचे समोर आपल्या व्यथा मांडल्या यामध्ये सध्या सत्तेत असणार्‍याकडून घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांच्या वर सत्ताधारी सतत अन्याय करत आलेले आहेत .सभासदांच्या वर शेअर परत घेणेसाठी जबरदस्ती करणे, तसेच ऊसतोड यंत्रणा न देणे, साखर बंद करणे,घाटमाथ्यावरील सभासद अक्रियाशील करणे यासारखे अनेक अन्याय त्ताधार्‍यांच्या कडून केले जात असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली . यावेळी रामभाऊ देशमुख, रमेश एडके, बाळासो वत्रे ,राजेंद्र मोहिते, सचिन दाईगंडे ,दिलिप मोहिते  ,धनाजी मोहिते ,सतिश तुपे, अमोल होलमुखे यांचेसह शेतकरी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments