Daily Mahasatta

Daily Mahasatta

वस्ताद जगन्नाथ जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंचोलीला कुस्ती मैदानाचे आयोजन

शेडगेवाडी/ शिराळा ( याकुब मुल्ला )
शिराळा तालुक्यातील चिंचोली गावचे जुन्या काळातील नामांकीत पैलवान व शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक चिंचोली गावचे वस्ताद स्वर्गीय जगन्नाथ आबा जाधव यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ निकाली कुस्यांचे जंगी मैदान मंगळवार दिनांक ९/२/२०२१ रोजी हनुमान कुस्ती आखाडा चिंचोली व पैलवान सुरेश जाधव पैलवान दिनेश जाधव मित्र परिवार चिंचोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले आहे.

जगन्नाथ जाधव यांनी अनेक वर्षे लाल मातीची अखंड सेवा केली असून जाधव घराण्यातील कुस्ती आणि भक्तीचा वारसा त्यांनी अनेक वर्षे जपला. जुन्या काळात स्वत प्रसिद्ध पैलवान होते व ऊत्तम हार्मोनियम वादक होते. आपल्या कारकिर्दीत अनेक मल्लांना त्यांनी कुस्तीचे धडे दिले. तसेच आपल्या कारकिर्दीत गावामध्ये भजण परंपरा जिवंत ठेवली. जगन्नाथ जाधव हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक पै.सुरेश जाधव व पै. दिनेश जाधव यांचे वडील होत. चिंचोली आणि चिंचोली पंचक्रोशीत त्यांना वस्ताद या नावाने ओळखले जात होते.

मैदानामध्ये नंबर ऐक साठी पै. दत्ता बाणकर चिंचोली व पै .रामा माने वारणा, दोन नंबरला पै. अजय शेडगे न्यु मोतीबाग व शुभम पाटील सागाव, तिन नंबरला पै. विकी थोरात ओंड व सौरभ नांगरे कोकरूड, चार नंबरचा पै मयुर जाधव चिंचोली व सुरज पाटील फुफेरे ,पाच नंबरला पै. ओमकार जाधव मल्लविध्या कुस्ती केंद्र व अमर पाटील शित्तुर अशा मोठ्या पाच कुसत्या आयोजित केल्या आहेत.त्याच बरोबर लहान मोठ्या पन्नास हुन अधिक कुस्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

कुस्ती मैदानासाठी मा. किशन पाटील विमा प्रतिनिधी मा. युवा नेते पंचायत समिती सदस्य मा. अमरसौ पाटील, मा श्री. साईदत्त परिवाराचे अध्यक्ष सुरेशभाऊ रांजवण, काणसा वारणा फौऊडेशनचे विध्यमान संस्थापक अध्यक्ष दिपकदादा पाटील, कुस्ती प्रेमी तानाजी पाटील पनुंब्रे, व मा. संजयआप्पा शिरसट ,युवा उद्योजक मा. शरद पाटील भेडसगाव यांनी कुस्त्या पुरस्कृत केलेल्या आहेत.

कुस्ती मैदानासाठी सामाजिक ,राजकीय ,कला, क्रीडा ,शिक्षण ,साहित्य ,कृषी ,क्षेत्रातील अनेक मान्यवर व कुस्ती शौकिन उपस्थित राहणार आहेत.कुस्ती मैदानावर हालगीसम्राट मारूती मोरे व सहकारी हे हालगीवादन करणार आहेत तसेच सुप्रसिध्द कुस्ती निवेदक पै सुरेश जाधव हे समालोचन करणार आहेत.

Post a Comment

0 Comments