Daily Mahasatta

Daily Mahasatta

माजी आम. स्वर्गीय विलासराव शिंदे यांचा वैचारिक वारसा जोपासावा : आ. सदाभाऊ खोत

आष्टा ( रुपेश रुगे)
माजी आमदार स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब यांनी शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, वंचित समाजाच्या उद्धारासाठी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केले. त्यांचा वैचारिक वारसा आपण सर्वांनी जोपासावा हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे, असे मत माजी कृषी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. 

आष्टा येथे माजी आमदार स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी  शक्तीस्थळ येथे आमदार मा. सदाभाऊ खोत यांच्यासह मान्यवरांनी विलासराव शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली. जयंतीनिमित्त स्वर्गीय शिंदे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष  मा.राहुल दादा महाडिक, मा. झुंजारराव शिंदे,  मा. वैभव दादा शिंदे, माजी नगरसेवक 
मा.अमोल पडळकर, अहिरवाडीचे माजी सरपंच मा.राहुल कदम, मा.पांडुरंग बसुगडे, सतीश कुलकर्णी, अनिल पाटील, दिलीप सावंत, शहाजी पाटील यांच्यासह  मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments