Daily Mahasatta

Daily Mahasatta

शेतकरी बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा : प्रतिक पाटील

पेठ ( रियाज मुल्ला )
शेतकरी बंधूंनी लवकरात लवकर शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून, ठिबक सिंचन व ड्रोन द्वारे औषध फवारणी करणे असे आधुनिक तंत्रज्ञान शेतीसाठी वापरणे ही काळाची गरज असल्याचे मत युवा नेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केले. ते पेठ ता. वाळवा येथील शेतकरी परिसंवाद व राजारामबापू पाटील उच्च तंत्रज्ञान गट शेती ठिबक सिंचन योजना कार्यक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

प्रतीक पाटील म्हणाले, सध्या पाण्याचा वापर जास्त झाल्यामुळे जमीन क्षारपड व नापीक होत आहे. आधुनिक शेतीच्या माध्यमातून कमीत कमी पाण्यात ड्रोन च्या माध्यमातून जास्तीत जास्त एकरात औषध फवारणी होते. सर्वसाधारण एकरी दहा लिटर पाण्यात व अवघ्या सहा मिनिटात एकरी औषध फवारणी होते. यासाठी एकरी पन्नास हजार रुपये खर्च असून सुरुवातीला शेतकऱ्यांनी दहा हजार रुपये कारखान्याकडे भरून नंतर ची रक्कम मुदतीनुसार परतफेड करावयाची आहे.

यावेळी सुभाष जमदाडे यांनी ठिबक सिंचन व ड्रोनद्वारे औषध फवारणी, गट शेती आदी बाबतची सविस्तर माहिती दिली. स्वागत प्रास्ताविक युवा नेते अतुल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डी.जी. खोत यांनी तर माजी उपसरपंच संदीप पाटील यांनी आभार मांडले.यावेळी विजय पाटील, ड्रोन संचालक अतुल पाटील, सुजयकुमार पाटील आदींनी मनोगत व्यक्त केलीत.

माजी जि. प.अध्यक्ष देवराजदादा पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील,शरद पाटील, हेमंत पाटील, प्रशांत पाटील, रोहित पाटील, आत्मशक्ती पतसंस्थेचे चेअरमन हंबीरराव पाटील, संजय शिंदे, नामदेव मोहिते, एम.एस.पाटील, भागवत पाटील, संपतराव पाटील, ज्ञानेश्वर पेठकर, पेठ पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग, राष्ट्रवादी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments