Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली महापालिकेतील कामगिरीसाठी पृथ्वीराज पाटील यांना शाबासकीची थाप

सांगली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महापालिकेतील सत्ताबदला नंतर पृथ्वीराज पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची पाठ थोपटली आहे.

सांगली, (प्रतिनिधी)
सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेची सत्ता खेचून आणल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी सत्तांतरा नंतर  पृथ्वीराज पाटील यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांचे तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांचे, नगरसेवक व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून पाठ थोपटली आहे.

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज नाना पटोले यांची भेट घेतली आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यात मुख्य  भूमिका बजावणार्या पृथ्वीराज पाटील यांच्यासह अन्य नेतेमंडळीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कौतुक केले.

सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीनंतर झालेल्या सत्ता बदलाची माहिती त्यांनी यावेळी श्री. पटोले यांना दिली. भाजपकडून सत्ता खेचून आणल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
------

Post a Comment

0 Comments