Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिधापत्रिका शोध मोहिमेत उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे : तहसिलदार सचिन पाटील

जत, (सोमनिंग कोळी)
शासनाकडून दि .१ फेब्रुवारी ते दि .३० एप्रिल २०२१ या कालाधीत शिधापत्रिका शोध मोहिम राबविणेत येणार असून सदर कालावधीत बी. पी. एल., अंत्योदय, अन्नसुरक्षा, अन्नपुर्णा, केशरी, शुभ व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करणेत येणार आहे. सदर शोध मोहिमेत तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी विहीत नमुन्यातील फॉर्म भरुन संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांकडे व गावकामगार तलाठी यांचेकडे जमा करून शिधापत्रिका शोध मोहिमेत जनतेने उत्स्फुर्त सहभागी व्हावे, असे आवाहन तहसिलदार सचिन पाटील यांनी केले आहे.

पाटील म्हणाले, शिधापत्रिका शोध मोहिम सुरू आहे. तरी शिधापत्रिकाधारकांनी ते त्या गावात रहात असल्याचा पुरावा जोडणेचा आहे.
पुरावा म्हणून भाडे पावती, निवासस्थानाच्या मालकीबाबतचा पुरावा, LPG जोडणी
क्रमांक, बँक पासबुक झेरॉक्स, विजेचे देयक, टेलिफोन, मोबाईल देयक, ड्रायव्हींग लायसन्स, ओळखपत्र कार्यालयीन इतर, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड व तहसिलदार, जत यांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादीच्या छायांकित प्रती जोडणेच्या आहेत.

पुरावा हा एक वर्षाहून जास्त कालावधीपेक्षा जूना असू नये. तरी तालुक्यातील सर्व शिधापत्रिका धारकांनी विहीत नमुन्यातील फॉर्म परीपुर्ण भरुन त्यासोबत पुरावा म्हणून नमुद केलेली सर्व कागदपत्रे जोडून आपले स्वस्त धान्य दुकानदार व गावकामगार तलाठी यांचेकडे जमा करणेचे आहे. याबाबत कोणीही दुर्लक्ष व टाळाटाळ करु नये व शासनाच्या सदर शिधापत्रिका शोध मोहिमेत सहभागी होवून सहकार्य करावे असे आवाहन सचिन पाटील, यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments