Daily Mahasatta

Daily Mahasatta

बाल शाहिर इम्रान संदे याचा पोवाडा होतोय तुफान व्हायरल

पेठ (रियाज मुल्ला)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कार्यातून महाराष्ट्राची भूमी पावन केली. त्या शिवरायांचे चाहते आजपर्यंत अगणित आहेत आणि तहयात राहतील. असाच एक शिवरायांचा चाहता शंभूराजांचा पाईक विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल साखराळे येथे इयत्ता सहावी मध्ये शिकणारा इम्रान नासिर संदे याला इतिहासाची प्रचंड ओढ. त्यामुळेच त्याने शिवजयंती निमित्त बालशाहीर बनून जय मल्हार स्टुडिओ, कापूसखेड* येथे श्री जयकर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली अफजलखानाचा वध यावर शिवरायांचा पोवाडा रेकॉर्ड केला आणि आज हा पोवाडा युट्युब, फेसबुक, इन्स्ट्राग्राम, टेलिग्राम आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून घराघरात पोहोचला.

शिवजयंतीनिमित्त पोवाड्याच्या माध्यमातून शिवरायांना दिलेला जणु हा मानाचा मुजराच आहे. सतत महाराजांचा ध्यास घेणारा इम्रान त्याला तलवार, भाला, ढाल, घोडेस्वारी, गड-किल्ले याचे प्रचंड आकर्षण आहे. घरामध्ये खेळण्यातल्या तलवारी सतत हताळत असतो. ऐतिहासिक मालिका म्हणजेच छत्रपती संभाजी, जिजामाता पाहण्याची आवड आहे. तसेच त्याचे पाठांतर जबरदस्त आहे. त्याच बरोबर इम्रान संदे अभ्यासातही अव्वल तर आहेच व क्लास मॉनिटर ची भूमिका अगदी लीलया पार पाडतो.

त्याला संगीताची आवड असलेने कमी वेळेत सुंदर पद्धतीनं सुंदरसा पियानो वाजवतो आणि विशेष म्हणजे याच्याकडे दोन्ही हाताने एकाचवेळी व सेम अक्षरात लिहिण्याची कला आहे. त्याच बरोबर नाणी संग्रहांची त्याला खूप आवड आहे. अशा अनेक गुणांनी युक्‍त असणारा हा अवलिया बालशाहीर ज्याला त्याचे वडील नासिरहुसेन संदे, आई इरफाना संदे तसेच विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल चे प्रिन्सिपल नारायन कोटूर , वर्गशिक्षिका अपर्णा लांडगे व संगीत शिक्षक जयकर जाधव आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments