Daily Mahasatta

Daily Mahasatta

मदनी चॅरिटेबल ट्रस्टला जिल्हाधिकारी यांच्याकडून सन्मानपत्र

सांगली ( प्रतिनिधी)
सांगली मधील मदनी चॅरिटेबल ट्रस्टला जिल्हाधिकारी यांनी सन्मान पत्र देऊन गौरविले आहे. या ट्रस्टच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सामाजिक क्षेत्रांत केलेल्या कार्याची पोहोच पावती मिळाली आहे. महापूर आणि कोरोनाच्या साथीत मदनी ट्रस्टने केलेल्या विधायक कार्याची दखल घेत ट्रस्टच्या भावी काळातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महापुराच्या काळात बाधित झालेल्या पूरग्रस्त 15 हजारहून अधिक कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते. कोरोनाच्या देशव्यापी संकटात दोन महिने सातशे लोकांना जेवण व बारा हजार हून अधिक जीवनावश्यक वस्तूची किट, वाटप करून दिलासा दिला. दोन रुग्णवाहिका प्रशासनाला मोफत दिल्या, सर्वजाती धर्माच्या मृत पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला. कोरोनाच्या रुग्णांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यासाठी प्रत्यक्ष मदत केली. कोरोनाच्या काळात झटणाऱ्या डॉक्टर, रुग्णवाहिका चालक, प्रशासनातील अधिकारी स्वयंसेवक यांच्या वाहनांची देखभाल म्हणून दुरुस्ती केली. कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा होता. त्यासाठी रक्तदान शिबिर घेतले. 

यासह अनेक सामाजिक उपक्रम राबवून नागरीकांना मदत केली. तसेच प्रशासना बरोबर समनव्य राखून "माझी कुटूंब माझी जबाबदारी" हा उपक्रम राबवितांना प्रत्येक तालुक्यात जाऊन लोकांना माहिती दिली. दिव्यांग लोकांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप जिल्हापोलिस प्रमुख सुहेल शर्मा यांच्या हस्ते वाटप केले. या सर्व कामाचा अहवाल जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी पाहिले. प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कोविड आणि महापूर या काळात भाग घेतला.

या सर्व कार्याची दखल घेऊन सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सन्मान पत्र देऊन मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. संस्थांनी साथ दिल्यास अनेक योजना यशस्वी होतात आणि लोकांनाही मदत मिळते असे ते म्हणाले. मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, ट्रस्टचे महासचिव सुफीयांन पठाण यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून सन्मान पत्र स्वीकारले.

Post a Comment

0 Comments